✒ होय मि लेखक - भाग १ 👉 खरंच ग्रामीण भागातील कला लोप पावत चाललीय काय हो ?
- प्रेम शंकरराव भोसले
- Feb 11, 2018
- 1 min read

✒ होय मि लेखक - भाग १
👉 खरंच ग्रामीण भागातील कला लोप पावत चाललीय काय हो ?
👉 खरंच ग्रामीण भागातील कला लोप पावत चाललीय काय हो ?👉 खरंच ग्रामीण भागातील कला लोप पावत चाललीय काय हो ?
आता जरा डोक्यावर ताण देऊन थोड आठवुन बघा....आठवतंय काय हो तुम्हाला आपण लहान असायचो अचानक पोलिस यायचे व आपल्या घरात दमदाटी करायचे आपल्याला घाबरवायचे आपण खुप घाबरायचो पण आपल्या घरचे त्यांना पैसे देऊन माघारी पाठवायचे. परत थोड्या वेळाने आपल्याला समजायचं कि ते खोटे पोलिस ( बहुरूपी ) असायचे म्हणुन...
पण आज तेच बहुरूपी आपल्याला क्वचितच पहायला मिळतात. नक्की का ? कशामुळे ? कुठे गायब झाले असतील ?.खरं तर त्या लोकांमुळेच ग्रामीण भागात थोड का होईना मनोरंजन तरी व्हायचं...
एक असाच प्रसंग आहे माझ्या घरी पुर्वी पासुन एक किराणा मालाच दुकान आहे. आम्ही दुकानात होतो मि बञ्यापैकी लहान होतो असाचं एक बहुरूपी पोलिसाच्या वेशात आला होता आणि मोठ्या आवाजात आमच्या वडीलांना बोलला होता - "तुम्ही गावातले मोठे दुकानदार...आणि तेलात पाणी ओतुन विकता चला जेल मध्ये...." परत तो माझ्याकडे आला व बोलला "तुच आमच्या बैलगाडीच्या काचा फोडल्यास ना चल जेल मध्ये" मि तर खुप घाबरलो होतो मोठ्याने रडू लागलो होतो.पण वडील निवांत होते त्याला १० रूपये दिले व तो पुढे निघुन गेला तेव्हा मला समजलं की बाबा असे गावोगावी बहुरूपी येतात म्हणुन...
आता ते पुर्वी सारखे येत ही नाहीत & दिसत ही नाहीत ओ पण कदाचीत ग्रामीण लोकांना या सर्व कलांचा विसर पडत चाललांय अस मला वाटतंय.ग्रामीण संस्कृती जोपासली पाहीजे तिला वाव मिळाला पाहीजे.कला हिच अशी गोष्ट आहे जिच्या पासुन आपला उदरनिर्वाह होतो बरोबर ना...
एक गोष्ट नक्की - खोटे पोलिस बननारे बहुरूपीच त्यावेळीचे खरे अधिकारी होते बरका
लेखक :- प्रेम शंकरराव भोसले © ( premshankarraobhosale99@gmail.com)
Comments